EPILEPSY SEIZURES FITS : मिरगी, फिट्स, आकडी
याची लक्षणे कोणती असतात आणि हा कोणत्या व्यक्तीला होतो, का होतो, कोणत्या प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात, या आजारासाठी किती दिवस ट्रिटमेंट घ्यावी लागते.“2024-06-22”
प्रश्न
1: मिरगी, फिट्स,
आकडी
याची
लक्षणे
कोणती
असतात
आणि
हा
कोणत्या
व्यक्तीला
होतो
?
उत्तर: हा आजार
कोणालाही होऊ शकतो
अगदी नुकत्याच जन्मलेल्या
लहान मुलांपासून शंभर
वर्षाच्या म्हातार्या व्यक्तीपर्यंत. यामध्ये रोगी
व्यक्तीला सर्वसामान्यांना माहीत
असल्याप्रमाणे दोन्ही हात,
दोन्ही पायांना झटके
येतात आणि तोंडातून
फेस येतो डोळे
पांढरे होतात आणी
थोड्या वेळानंतर ती
व्यक्ती बेशुद्ध होऊन
जाते, याव्यतिरिक्त क्वचित
आढळणाऱ्या लक्षणांमध्ये लहान
मुलांमध्ये फक्त डोळ्यांच्या
पापण्यांची फडफड होणे
व एकटक बघणे,
संपूर्ण शरीराला एक
झटका बसून खाली
पडणे किंवा फक्त
एक हात थरथरणे
आणि चेहरा वाकडा
होणे, फक्त बेशुद्ध
पडणे अशा गोष्टी
येतात.
प्रश्न
2: झटक्याचा
आजार
का
होतो
?
उत्तर: यामध्ये कारणांना
आपण तीन गोष्टीत
विभागू शकतो
प्रथम
म्हणजे जन्मानंतर आलेल्या
गोष्टी, जसे की
नुकतेच जन्मलेले बाळ
जर रडले नाही
तर त्याच्या मेंदूला
होणारी इजा पुढील
आयुष्यासाठी झटक्याचे कारण
बनू शकते लहान
मुलांचे रडणे म्हणजे
त्यांचा प्रथम श्वास
घेण्याचा प्रयत्न असतो
या काळात मेंदूला जो
ऑक्सिजन पुरवठा कमी
होतो त्यामुळे त्याला
इजा होते व
भविष्यात त्याला झटके
येण्याचे प्रमाण वाढते, तसेच
जन्मानंतर मेंदूला मार
लागणे मेंदूत जंतुसंसर्गामुळे
ताप जाणे, तरुण किंवा म्हाताऱ्या
व्यक्तीमध्ये मेंदूत रक्ताची
गाठ होणे, मेंदूमध्ये
कॅन्सर होणे या
कारणाने
ही
झटक्याचे प्रमाण वाढते.
द्वितीय
कारण म्हणजे तात्पुरत्या
स्वरूपाच्या गोष्टी यामध्ये
रक्तातील साखरेचे मिठाचे प्रमाण
कमी-अधिक होणे
किंवा विषारी गोष्टी
जसे की दारु
व इतर पदार्थ
यांचे प्रमाण रक्तामध्ये
वाढणे. याव्यतिरिक्त
अतिशय कमी प्रमाणामध्ये
अनुवंशिकतेमुळे सुद्धा झटके
येण्याचे प्रमाण वाढते
जसे की घरामध्ये
आई वडील आजी
आजोबा काका मावशी
यांच्यापैकी कुणाला जर
झटके येत असतील
तर त्या व्यक्तीलाही
झटके येऊ शकतात.
प्रश्न
3: आजारी
व्यक्तीच्या शरीरात
असे
काय
बदल
होतात
ज्यामुळे
त्याला
झटक्याचा
त्रास
होतो
?
उत्तर:
शरीराच्या सर्व हालचाली
मेंदूवरुन नियंत्रित होतात,
याचे नियंत्रण मेंदूमध्ये
असलेल्या पेशींच्या विविध
घटकावर अवलंबून असते.
या पेशींना झालेल्या
इजेमुळे त्याचे संतुलन
बिघडून जाते आणि
अवेळी अनियंत्रित विद्युत्
लहरी तयार होतात
या विद्युत लहरींच्या
कारणाने हाता-पायांना
झटके येणे बेशुद्ध
पडणे अशी लक्षणे
आपल्याला बाहेरून दिसतात.
अतिशय सौम्य स्वरूपात कधी
तरी लागलेला मार
किंवा इजा हळूहळू
पेशींमध्ये असे बदल
घडवून आणतात की
ज्याच्यामुळे झटके येणे
सुरू होते. म्हणजेच
झटके येणे एक
लक्षण आहे तो
आजार नाही.
प्रश्न
4 : या
आजारासाठी
कोणत्या
प्रकारच्या तपासण्या
कराव्या
लागतात
?
उत्तर:
दवाखान्यात गेल्यानंतर झटक्याचे
कारण शोधण्यासाठी डॉक्टर
मेंदूचा स्कॅन करतात
जो की सिटीस्कॅन
किंवा एम आर
आय असतो. यामध्ये
आपल्याला मेंदूच्या संरचने
बद्दल माहिती मिळाते,
कुठे इजा झालेली
आहे का कुठे
रक्ताची गुठळी आहे
का हे समजते. EEG म्हणजे मेंदूची पट्टी
ही दुसरी महत्त्वाची
तपासणी आहे यामध्ये
मेंदूमध्ये तयार होणाऱ्या
अनियंत्रित विद्युत् लहरी
कोणत्या भागातून तयार
होतात, त्या कोणत्या
प्रकारच्या असतात, त्या
किती वेळ राहतात
याची माहिती भेटते.
रक्ताच्या
तपासणीमध्ये आपल्याला रक्तातील
घटकांचे कमी-जास्त
प्रमाण समजते आणि
त्यानुसार आपल्याला त्या
व्यक्तीला ट्रीटमेंट देता
येते.
प्रश्न
5: मिरगी
किंवा
झटका
या
आजारासाठी
किती
दिवस
ट्रिटमेंट
घ्यावी
लागते
?
उत्तर:
या आजारासाठी लागणाऱ्या
उपचाराचा कालावधी त्यामागील
कारणावर अवलंबून असतो
अतिशय सरळ अशा
गोष्टी म्हणजे रक्तातील
काही घटकांच्या कमी-जास्त पणा मुळे
येणारा झटका, फक्त
काही दिवसांच्या ट्रीटमेंट
मध्ये बरा होतो.
याउलट काही अनुवंशिक
कारण जर असेल
तर त्या व्यक्तीला
बरयाचवेळी आयुष्यभर मेडिसिन
घ्यावे लागतात.
जर
मेंदूला एखाद्या गोष्टीमुळे
जर इजा झालेली
असेल तर त्यासाठी
लागणारा कालावधी हा
त्या डॅमेज च्या
प्रमाणावर अवलंबून असतो.
तो काही महिन्यापासून
तर काही वर्षापर्यंत
असू शकतो. कधीकधी
या सर्व तपासण्या
मध्ये काहीही निष्पन्न
होत नाही अशावेळेस
कमीत कमी 3 वर्ष
औषध उपचार घेणे
गरजेचं असतं.
प्रश्न
6: एखाद्या
व्यक्तीस
झटका
आला
तर
लगेच
काय
करावे
?
उत्तर:
याबाबतीत समाजामध्ये अनेक
समज-गैरसमज आहेत
99% येणारे
झटके हे पाच
मिनिटात आपोआप बंद
होतात. यामध्ये हातामध्ये
लोखंडी वस्तू देणे,
नाकाला कांदा लावणे,
तोंडात चमच्या घालने
याचा काहीही उपयोग
होत नाही. कारण
अशी काही करेपर्यंत
तीन ते पाच
मिनिटे निघून जातात
आणि आपोआप झटके
बंद होतात पण
आपल्याला असे वाटते
की आपण केलेल्या
गोष्टीमुळे ते थांबले.
जेव्हा
एखाद्या व्यक्तीला झटका
येतो तेव्हा पहिली
गोष्ट म्हणजे त्याला
आजूबाजूच्या
इजा
करू शकणाऱ्या गोष्टींपासून
दूर करणे जेणेकरून
त्याला काही इजा
होणार नाही. त्या
व्यक्तीला एका अंगावर
झोपवणे जेणेकरून तोंडातून
येणारी लाळ फुफुसात
न जाता ती
बाहेर निघून जाईल.
यानंतर उपलब्ध असेल
तर आपल्या मोबाईलचा
योग्य वापर करून
झटक्याचा व्हिडिओ बनवणे
जेणेकरून निदान करण्यास
आणि उपचार करण्यास
डॉक्टरांना या झटक्याबद्दल
अधिक माहिती मिळू
शकते. जर लागोपाठ
दोन झटके आले
किंवा दोन झटक्यादरम्यान
ही व्यक्ती शुद्धीवर
नाही आली तर
लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये
घेऊन जाणे कारण
असे झाल्यास त्या
व्यक्तीच्या मेंदूला कायमस्वरूपी
इजा होऊ शकते.
प्रश्न
7: झटका
येणाऱ्या
व्यक्तीला
कोणत्या
गोष्टीमुळे झटक्याचा
प्रमाणात
वाढ
होऊ
शकते
?
उत्तर:
ज्या व्यक्तीला झटक्यांचा
त्रास होतो त्या
व्यक्तीने जर गोळ्या
वेळेवर घेतल्या नाहीत
तर झटका येण्याचा
त्रास वाटतो, गोळ्या
जेवणानंतरच
घ्यावे
असे काही नसते
त्यामुळे दिलेल्या वेळी
गोळ्या घेणे.
रात्री 6-8 तास शांत
झोप गरजेची असते,
जागरण केल्याने झटका
येण्याचे प्रमाण वाढते.
उपवास करणे टाळावे,
दररोज वेळेवर जेवण
करावे अन्यथा झटका
येण्याचे प्रमाण वाढते.
सर्दी
खोकला जुलाब उलटी
यासारख्या कोणत्याही कारणाने
आलेला ताप अंगावर
काढू नये कारण
शंभरच्या पुढे ताप
गेल्यानंतर झटका येण्याचे
प्रमाण वाढते अशा
वेळेस शक्यतो जवळच्या
डॉक्टरांना भेटावे किंवा
तापेसाठी औषध घेऊन
ताप तात्पुरत्या स्वरूपात
कमी करावी.
कोणत्याही
प्रकारचे व्यसन करू
नयेत दारू बिडी
सिगरेट गुटखा तंबाखू
गांजा अशा गोष्टींमुळे
औषधाचे शरीरातील प्रमाण
कमी होते व
झटका येण्याचे प्रमाण
वाढते.
प्रश्न
8: या
आजारासाठी
ऑपरेशन
करावे
लागते
का
?
उत्तर: 90% लोकांमध्ये
हा आजार गोळ्या
औषधानेच बरा होतो
किंवा नियंत्रणात आणता
येतो ज्यावेळेस मेंदूच्या
एखाद्या भागात गाठ किंवा
व्रण सापडतो अशा
वेळेस त्याला काढून
टाकले तर झटक्याचे
प्रमाण कमी होऊन
जाते किंवा बंद
होते व गोळ्यांचीही
गरज पडत नाही,
सर्वसामान्यपणे अशाच केसेसमध्ये
ऑपरेशनची गरज पडते
याव्यतिरिक्त जेव्हा कधी
गोळ्यांनी आजार नियंत्रणात
येत नाही त्यावेळेस
तो कंट्रोल करण्यासाठी
काही वेगळ्या स्वरूपाच्या
ऑपरेशन करावी लागतात.
प्रश्न
9: झटक्याचा आजार
असलेली
स्त्री
प्रेग्नेंट होऊ
शकते
का
? तिच्या बाळाला
हा
त्रास
होण्याचे
प्रमाण
काय
?
उत्तर:
झटक्याचा आजार असलेल्या
व्यक्तींच्या आजाराला जर
योग्य प्रमाणात आटोक्यात
आणले तर ती
गर्भवती राहू शकते
आणी कोणत्याही प्रकारचा
त्रास न होता
त्यांची प्रसूती व्यवस्थित
होते. बाळाला
त्रास होण्याचे प्रमाण
हे कोणत्या कारणामुळे
आईला झटके येतात
त्याच्यावर अवलंबून असते,
पण बऱ्याच प्रमाणात
हा आजार बाळाकडे
जाण्यापासून रोखता येतो.
फक्त गर्भवती राहण्याच्या
पुर्वीपासून औषधांचा योग्य
प्रमाणात वापर करावा
लागतो जेणेकरून त्या
औषधाचा बाळावर त्रास
होणार नाही.
प्रश्न
10: झटक्यांचा
आजार
असणाऱ्या
व्यक्तींनी कोणत्या
डॉक्टरांचा सल्ला
घ्यावा
?
उत्तर:
मेंदू रोग तज्ञ
म्हणजेच न्यूरो फिजिशियन
झटक्याच्या आजारांवर उपचार
करतात. गरजेनुसार ऑपरेशनसाठी
न्यूरोसर्जनही उपचारात सामील
होतात.
वरील
दिलेल्या माहितीप्रमाणे झटक्यांच्या
आजार हा त्याच्या
कारणानुसार पुर्णपणे बरा
करता येतो किंवा
नियंत्रणात आणता येतो.
यासाठी फक्त लवकर
निदान योग्य उपचार,
सयंम आणि काही
पथ्य पाळण्याची गरज
आहे.